प्रथमेश अमृतराव ची शालेय साॅफ्ट टेनिस स्पर्धेत राज्यस्तरावर धडक
तुळजापूर, दि. ०९
शहरातील लोटस पब्लिक स्कुल चा विद्यार्थी प्रथमेश प्रदिप अमृतराव याने शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करत राज्य स्तरीय पातळीवर धडक मारली आहे. प्रथमेश अमृतराव चे या यशाचे कौतुक होत आहे.
लातूर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील शालेय साॅफ्ट टेनिस प्रथमेश अमृतराव ने उत्कृष्ट कामगिरी करत उपांत फेरी पर्यंत मजल मारत कोल्हापुर येथे होणार् या राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
प्रथमेश अमृतराव ला प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रथमेश अमृतराव च्या या यशाबद्दल उस्मानाबाद जिल्हा साॅफ्ट टेनिस असोसिएशन चे अध्यक्ष संदीप गंगणे, सचिव सिराज शेख, किरण हंगरगेकर, लोटस पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक धनंजय शहापुरे, संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव, संस्थेचे सचिव आणि कोषाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, श्रीकांत कावरे आदींनी अभिनंदन केले आहे.