मुरूम दि. ०७,
येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात दि.०७ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फतीमा शेख आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या त्रिवेणी संगमावर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या महानंदा रोडगे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमरगा येथील जेष्ठ कवी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर भोसले,उपमुख्यध्यापक उल्हास घुरघुरे, प्रा.सतीश रामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी हॉलो मेडिकल फाउंडेशनने आयोजिलेल्या निबंध स्पर्धतील विद्यार्थ्यांना सलग चार वर्षे प्रथम क्रमांक मिळाला स्पर्धेचे मार्गदर्शक प्रा.रामपुरे यांचा प्रमुख पाहुणे सन्माननीय कमलाकर भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.१२ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देतांना परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे मन तणावमुक्त व्हावे त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मनोरंजन करण्यासाठी भोसले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या विनोदी शैलीत हास्या बरोबर शिक्षणाचा मूलमंत्र त्यांनी यावेळी दिला.
यावेळी भोसले म्हणाले विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षण आत्मसात करून उपयोग नाही तर त्या शिक्षणाचा त्यातून घेतलेल्या ज्ञानाचा समाज कार्यासाठीसाठी व्हावा. घडावे, ज्ञान हे सेवा परायण असावे, शिक्षण हे विद्यार्थी परायण असावे तर ज्ञान हे सेवा परायण असावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर त्यांनी आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांचे प्रबोधन ,मनोरंजन करून संपूर्ण सभागृहात हास्यमय वातावरण निर्मिती करून विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्वी तणावमुक्त वातावरण निर्माण केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते चैतन्यमूर्ती माधवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. समोरोपप्रसंगी बोलताना प्राचार्या रोडगे म्हणाल्या कोणताही विद्यार्थी ढ नसतो प्रत्येक विद्यार्थी हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात कलागूणसंपन्न असतो, विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी किडा न बनता सर्वगुण संपन्न ज्ञान आत्मसात करावे .असे आवाहन करून१२ च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कल्याणी टोपगे,सूत्रसंचालन डॉ. रमाकांत पाटील तर प्रा.सतीश रामपुरे यांनी आभार मानले.
प्रा.करबसप्पा ब्याळे,प्रा.अण्णाराव कांबळे,प्रा. बबलू अंबर,प्रा. संजय गिरी सह कर्मचारी वर्गानी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.