वागदरी, दि. ०५ एस.के.गायकवाड :

वागदरी ता.तुळजापूर येते ह.भ.प.राजकुमार पाटील यांच्या आधिष्ठाणाखाली दि.६ ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्री रामकथा महायज्ञ सप्ताह आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


  या सप्ताहात कथा निरुपणकार साध्वी अनुराधा दिदी पंढरपूर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या पारायण सप्ताहाचे हे सलग सोळाव्ये वर्ष असून  दि.६ फेब्रुवारी सकाळी ६.०० वा.दरम्यान गाथा पुजन, कलश पुजन,विना पुजन,म्रदंग पुजन,टाळ पुजन वगेरे धार्मिक कार्यक्रमाने या पारायण सप्ताहाची सुरुवात करण्यात येणार आहे. या सातदिवसीय पारायण सप्ताहात ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दिंडेगाव, सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर,क्रष्णा महाराज काकडे वागदरीकर,महेश महाराज माकणीकर,राजकुमार पाटील महाराज वागदरी, फुलचंद महाराज रिंगणीकर,आबा पाटील महाराज कुरनुर,श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा,आदी महाराजांची किर्तन सेवा होणार असून याप्रसंगी चिकुंद्रा, बाभळगाव, केरूर, उमरगा (चिवरी);चुंगी,अणदुर, काटगाव, गुळहळ्ळी, शहापूर, खुदावाडी, नळदुर्ग,सराटी, नंदगाव,सिंदगाव,दहीटणा, किलज,दिंडेगाव, शिरगापुर,सह परिसरातील भजनी मंडळाचा हरीजागर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 

दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी ह.भ.प.नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महप्रसादाने या गाथा पारायण सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
   

तरी वागदरी,नळदुर्ग व परिसरातील भाविक भक्तानी मोठ्या संख्येने या गाथा पारायण सप्ताहमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ह.भ.प.राजकुमार पाटील,शिवाजी मीटकर गुरुजी,श्रीशैल्य सुरेश पाटील महाराज, राजकुमार पवार,राम यादव, सुरेशसिंग परिहार आदीसह श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळ वागदरी व ग्रमस्थानी केले आहे.
 
Top