वागदरी ,दि . २४: एस.के.गायकवाड

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेवायोजना शिबिरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तमत्व विकासाला चालना मिळते .तेंव्हा विद्यार्थ्यांनी असा शिबिरातू बोध घेऊन कष्ट करण्याची तयारी ठेवून आपले निश्चित ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यानी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.


   डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता.तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यामाने वागदरी येथे राष्ट्रीय सेवायोजना शिबीर संपन्न झाले. या शिबिरात श्रमदान, ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन, व्यक्तीमत्व विकास, पशु चिकित्सा शिबीर, नेत्र व दंत तपासणी शिबीर, महिला मेळावा व रँली,व्रक्षारोपण नव मतदार जागृती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन किर्तन व प्रवचन आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.सात दिवशीय  निवाशी शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रमाधिकारी डाँ.निलेश शेरे, डॉ. रोहिणी महींद्रकर, प्रा.महेश भालेराव, डॉ. जयश्री घोडके, प्रा.गजानन चिंचडवाड, सहयोगी प्राध्यापक डॉ. अशोक कांबळे, डॉ. सचिव देवद्वारे, प्रा.हनुमंत पाटील, प्रा.नितीन बिराजदार,व सहयोगी शिक्षकेतर कर्मचारी सह ग्रामस्थ युवा कार्यकर्ते आदीनी परिश्रम घेतले.
 

 नुकताच या शिबिराचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी सिध्देश्वर गोरे बोलत होते.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर हे होते.  यावेळी सरपंच तेजाबाई मिटकर,उपसरपंच मिनाक्षी बिराजदार, शिवाजी मिटकर गुरुजी, माजी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, डॉ. सुभाष राठोड, डॉ. रामदास ढोकळे,डॉ. उध्दव भाले,डॉ. दिपक जगदाळे, डॉ. संतोष पवार,तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील,फतेसिंग ठाकूर, एस.के.गायकवाड,किशोर सुरवसे, दत्ता सुरवसे, प्रमोद सोमोसे, रामचंद्र यादव सह सर्व आजीमाजी सरपंच, उपसरपंच, ग्रा. प.सदस्य व ग्रामस्थ, महिला ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top