नळदुर्ग, दि. १७
नळदुर्ग येथील प्राचिन व प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दि. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त भव्य रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या रुद्राभिषेक सोहळयासाठी नाव नोंदणी सुरू असुन ज्यांना हा रुद्राभिषेक करायचा आहे. त्यांनी आपली नावे नोंदवावित असे आवाहन श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
शनीवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नळदुर्ग येथील प्राचीन व श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
महाशिवरात्री उत्सव
रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग येथे महाशिवरात्री निमित्त भव्य रुद्राभिषेक आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी श्री महादेव मंदिरात भव्य शृंगार व १०८ दांपत्या च्या हस्ते रुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्राभिषेक करिता ११०० रू देणगी आकारण्यात येणार आहे. १०८ दांपत्याना अभिषेकसाठी लागणारे साहित्य रामतीर्थ मंदिर संस्थान तर्फे देण्यात येईल ज्यामध्ये संगमरवरी पिंड, पुजापात्र, फुलपात्र, संध्यापळी, उपरणे, भगवी टोपी व प्रसाद देण्यात येणार आहे. तरी ज्या दाम्पत्यांना महाशिवरात्री निमित्त महादेवाला रुद्राभिषेक करावयाचा आहे त्यांनी खालील सदस्यांशी व रामतीर्थ देवस्थान येथे संपर्क साधावा. १०८ दाम्पत्याची नोंद पूर्ण झाल्यानंतर नोंदणी स्वीकारण्यात येणार नाही.
संपर्क
श्रमिक पोतदार 9096427282
लखन भोसले 9011660454
रोहित मोटे 8830608889
संकेत खद्दे 9975569195
नितेश कौरव 9518335522
पप्पू (अनिल) पाटील 9665242424