नळदुर्ग दि.१९

    शिवजयंती निमित्त छञपती शिवाजी महाराज यांचे १५१ पुतळे शिवप्रेमी नागरिकाना वाटप करण्याचा  कौतुकास्पद  उपक्रम युनिटी कंपनीच्या संचालकानी  राबविल्याबद्दल गौरव उदगार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी "शिवराय मनामनात ,शिवजयंती घरा घरात" या  कार्यक्रमाप्रसंगी  काढले.
   

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात शुक्रवारी "शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात" हा संकल्प घेऊन युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने नळदुर्ग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १५१ पुतळे घरघुती पूजेसाठी मोठ्या थाटात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणुन आमदार राणाजगजितसिह  पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारणी  सदस्य अँड. अनिल काळे, नितीन काळे, तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, माजी महापौर दिलीप कोल्हे, शिव व्याख्याते साईनाथ रुद्रके ,माजी नगरसेवक  नय्यर जहागीरदार, उदय  जगदाळे, सुनील रसाळ, संजय शिंदे, युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, संचालक जयधवल करकमकर, माजी नगरसेवक बसवराज धरणे, कमलाकर चव्हाण, सहाय्यक  पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, जहीर जहागीरदार, सुभद्राताई मुळे,  पत्रकार सुहास येडगे, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी  सदस्य शफी शेख, आदीजण व्यासपिठावर उपस्थित होते.
   

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हास्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर फटाक्याची आतीषबाजी करुन जल्लोष  करण्यात आला.

  यावेळी माजी मंत्री मधुकरराव  चव्हाण  म्हणाले की, युनिटी कंपनीने शिवजयंतीच्या अनुषंगाने शिवप्रेमी नागरिकाना छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी युनीटी कंपनीच्या संचालकाचे कौतुक  करुन  युवकानी छञपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जाणुन घेवुन त्यांचे  प्रेरणादायी कार्य आत्मसात करण्याचे सांगितले. यावेळी शिवव्याख्याते साईनाथ रुद्रके यांचे व्याख्यान झाले.  आमदार राणाजगजितसिह  पाटील यांनी  उपस्थिताना मार्गदर्शन  केले. 


 यावेळी कफील मौलवी, जयधवल करकमकर, यांचा सत्कार माजी सैनिक संघटना व वतीने पत्रकारच्या वतीने करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते यावेळी 151 पुतळ्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अक्षरवेल महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, भाजपचे  धिमाजी घुगे, सुशांत भूमकर, पद्माकर घोडके,  शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, मनसेचे ज्योतिबा येडगे, प्रमोद कुलकर्णी, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड,  सेवानिवृत्त शिक्षक, विविध संघटनेचे पदाधिकारी, माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक, माजी नगरसेवक  शहबाज काझी  आदीसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी तर आभार जयधवल करकमकर यांनी  मानले. या कार्यक्रमासाठी युनिटीचे रईस जाहागिरदार ,जुबेर काझी, निखिल येडगे, हाजी शेख यांच्यासह कर्मचा-यानी परिश्रम घेतले.

 प्रास्ताविकपर बोलताना  युनिटीचे मुख्य संचालक कफील मौलवी म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त " शिवराय मनामनात - शिवजयंती घराघरात " हा संकल्प गेल्यावर्षी करुन यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे घरघूती पूजेसाठी  पुतळे वाटप करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आसल्याची भावना व्यक्त केली.

  
शिवराय म्हणजे फक्त लढाई, गडकिल्ले, ढाल तलवार यापुरते मर्यादित नव्हते तर निसर्ग संवर्धक, जलनियोजन, आरमाराचे जनक, स्त्री रक्षणकर्ते, प्रजाहितदक्ष होते असे प्रतिपादन व्याख्याते साईनाथ रूद्रके यांनी केले.  तसेच आजच्या पिढीला शिवरायांचा आदर्श घेण्यासाठी आधी पालकांनी शहाजीराजे व जिजाऊंचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे रूद्रके यांनी सांगितले.

 
Top