काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कै. बाजीराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन ग्रुप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक अमरसिंह देशमुख यांच्या वतीने ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदावर काम करीत असलेल्या सविता महेश बनसोडे यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी कन्या कु. नकुशा महेश बनसोडे या गरीब कुटुंबातील विद्यार्थीनीला उद्योजक अमरसिंह देशमुख, संजय देशमुख यांच्या मातोश्री ग.बा. विजयादेवी बाजीराव देशमुख यांच्या हस्ते स्पर्धात्मक परिक्षेच्या पुर्व तयारीसाठी लागणारी विविध पुस्तके भेट देऊन कु.नकुशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
देशमुख बंधू यांचे सन ग्रुप उद्योग समूह सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असते. सध्याच्या या धावपळीच्या व स्वार्थी वृत्तीच्या युगात गरजूंना यथाशक्ती मदत करण्याच्या भावनेने व वडिलांचे छत्र हरपलेल्या व एमपीएससीची तयारी करणाऱ्या नकुशाला पुस्तके भेट देऊन दिशा देण्याचा छोटासा प्रयत्न प्रेरणादायी आहे.
भौतिक साधनांच्या उपभोगातून मिळणाऱ्या सुखापेक्षा यांसारख्या उपक्रमातील योगदानातून मिळणारे समाधान लाख मोलाचे असल्याचे उद्योजक अमरसिंह देशमुख यांनी सांगितले.
यावेळी ग.बा. विजयादेवी बाजीराव देशमुख, उद्योजक अमरसिंह देशमुख, विजयसिंह देशमुख, संजय देशमुख, अजयसिंह देशमुख, अभिजित देशमुख,अमित देशमुख, कु.नकुशा बनसोडे,सविता बनसोडे यांच्यासह देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते.