काटी, दि. १०
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील अनिल नामदेव काशिद (दहिवडीकर) वय 52 वर्षे यांचे सोमवार दि. 10 रोजी पहाटे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. चार दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ते व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापूर येथे स्थायिक होते. तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील कुलस्वामिनी हॉऊसिंग सोसायटी मध्ये ते वास्तव्यास होते व त्यांचे श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या गाळ्यामध्ये किराणा दुकान होते.
घरातील मुख्य आधारच गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर येथील घाटशिळ रोडवरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, सुन,जावाई, दोन बहिणी,एक भाऊ, भावजय,नातवंडे असा परिवार आहे.