नळदुर्ग दि.०९
मैदानी खेळापासुन युवक दुर जात असुन ग्रामीण भागातील युवकाना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कला गुणाना वाव मिळावे या हेतुने नळदुर्ग पोलिस ठाणे व आयोजन कमिटीच्यावतीने खुल्या गटासाठी
भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा दि.11 एप्रिल पासून नळदुर्ग शहरातील महामार्ग पोलीस केंद्राच्या मैदानावर होत आसल्याची माहिती साहय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यानी दिली.
या हॉलीबाॕल स्पर्धेचे मंगळवार दि. 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता धाराशिव पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील या आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी 201 रुपये असून प्रथम विजेत्या संघास पोलीस ठाण्याच्या वतीने ट्राफी व सात हजार रुपये रोख पारितोषक देण्यात येणार आहे. दुसरे पारितोषिक नगर परिषदेच्या वतीने ट्राफी व रोख पाच हजार, तिसरे पारितोषिक महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ट्राफी व तीन हजार रुपये, चौथे पारितोषिक महावितरण कार्यालयाच्या वतीने दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. त्याच बरोबर उत्कृष्ट संघ, उत्कृष्ट नेटमॅन, उत्कृष्ट शूटर आदीना ट्राफीचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हाद्दीतील गावातील जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे.असे आवाहन सपोनि सिध्देश्वर गोरे यानी केले आहे.