नळदुर्ग ,दि.०९
भरधाव मालट्रक व खासगी आराम बस यांच्यात जोरदार धडक होवुन झालेल्या आपघातात एकजण जागीच ठार तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गवरील नळदुर्गच्या घाटात मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
ट्रक क्र. जी.जे.३६/व्ही/४४२४ सोलापूरहुन हैद्राबादच्या दिशेने जात असताना नळदुर्ग घाटात विरुद्ध दिशेनी येणारी खासगी बस क्र.ए आर ०२ ए ६४४३ ही बस वाहनास ओलांडताना जोरदार धकड बसली. या अपघातात ट्रकचा सहचालक रिफाकत अल्लीभाई कडीवर वय २५ वर्षे रा. राजावटला ता. बाकानेर जि. मोरबी (गुजरात राज्य) हा मयत झाला आहे. तर ट्रक चालक जावेदभाई रसूलभाई, वडावीया वय ३६ वर्षे रा.सदर व बसमधील दहा प्रवासी जखमी झाले आहे. मयत व जखमीस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाता नंतर महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघाताची घटना समजताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनी सिध्देश्वर गोरे , महामार्ग पोलिस केंद्राचे सपोनि राठोड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन शर्थीचे प्रयत्न करून तब्बल तासभरानंतर क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.