नळदुर्ग, दि.०८
ग्रामीण भागातील खेळाडू देखील राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात हे आमच्या महाविद्यालयातील खेळाडुनी दाखवून दिले आहे असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले .
आशियाई चषक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खो- खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला .
नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कु.अवधूत पाटील, कु. सुयश गरगटे , कु. गौरी शिंदे या तीन खेळाडूंची आशियाई चषक खो-खो स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय संघात निवड झाल्याबद्दल आज महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदयस डॉ अंकुश कदम , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर विद्यापीठ खो खो संघाचे प्रशिक्षक डॉ रफीक शेख हे उपस्थित होते.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कोरेकर , कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील , क्रिडा शिक्षक डॉ कपिल सोनटक्के कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा चांद कुरेशी यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करुन त्यांना शुभेच्या देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुभाष राठोड यांनी केले तर आभार अधिक्षक धनंजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते .