नळदुर्ग, दि. २१
शहरातील हुतात्मा स्मारक येथे जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात अणदूर ता. तुळजापूर येथिल योग्य शिक्षक लक्ष्मण नरे आणि ज्ञानेश्वर मोकशे यांनी योगाचे प्रशिक्षण दिले.
यावेळी योग शिक्षक लक्ष्मण नरे यांनी बोलताना सांगितले की, आज संपूर्ण जगाने योगाला स्वीकारले असून आरोग्य जपण्यासाठी योग महत्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच वजन कमी करणे, शारीरिक आणि मानसिक लाभ मिळून शरीर अधिक लवचिक होण्यासाठी योगाचा फायदा होतो. शरीर निरोगी, बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व असून योगाभ्यास केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. मधुमेह, मानसिक त्रास, पचनशक्तीचा त्रासही योगासनांमुळे निघून जातो आणि शरीर अधिक निरोगी राहाते असे यावेळी सांगितले. याशिबिरात योग शिक्षक लक्ष्मण नरे, ज्ञानेश्वर मोकाशे यांचे अनेक वर्षांपासून योगाच्या प्रसारासाठी असलेल्या योगदानासाठी मोदी@9 या अभियानाअंतर्गत हार व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे सुशांत भूमकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, शहराध्यक्ष धीमाजी घुगे, समाजसेवक संजय जाधव, संतोष पाटील, सहशिक्षिका पुदाले कविता, दुगम अरूणा, सय्यद तस्लीम, उर्दू शाळेचे फजल शेख , इब्राहिम पठाण, अमेरा शेख , आयेशा पेरमपल्ली, संत निरंकारी ब्रँच मुखी सुनील पिस्के, श्रीमंत घुगे, ज्ञानेश्वर काळे, पवन चव्हाण, अनेक जण उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी अक्षय भोई, सुनील चौधरी, भीमाशंकर बताले, अबुलहसन रिझवी, यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात विविध शाळा व संघटनांनी सहभाग नोंदवला यामध्ये सय्यद अब्दुल्लाशाह मेमोरियल उर्दू स्कूल, जि.प. मुलांची शाळा, जि.प. मुलींची शाळा, संत निरंकारी मंडळ तसेच शहरातील जेष्ठ नागरिक महिला यांची उपस्थिती होती.