नळदुर्ग , दि. २१
पीक कर्जाची वसुली तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करू - मनसेचा एस.बी.आय.बँकेला इशारा
ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यातून पीक कर्जाची वसुली होत असून,जे शेतकरी सन २०२०-२१-२२ या वर्षात पीक कर्ज घेतले होते,परंतु नापिकी मूळे कर्ज भरू शकले नाहीत, अतिृष्टीमुळे सरकारने ही नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी का होईना अनुदान दिले,परंतु जे शेतकरी शेती सोबत जोडधंदा करतात, छोटे व्यापारी, अथवा अल्प पेंशन धारक,किंवा अन्य मार्गाने ज्यांच्या खात्यावर पैसे येत असतील अशा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर बँकेने रक्कम कपात करीत असल्याचे मनसेने म्हटले आहे,
यामुळे ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत, एकतर जून महिना संपत आला आहे,तरी पण पाऊस पडला नाही, दुसरीकडे बँका मनमानी धोरण राबवत खात्यातून पैसे कपात करत आहे,त्यातच २०२०,२१,२२ या वर्षाचा विमा पूर्ण मिळालेला नाही, सतत आर्थिक संकटात सापडत चाललेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नळदुर्ग व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यातून पीक कर्ज वसुली म्हणून रक्कम कपात केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना ती तात्काळ परत करावी व यापुढे पेरणी काळात कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांकडून वसुली करू नये अशी मागणी केली आहे,शेतकऱ्यांना याबाबत तात्काळ दिलासा न दिल्यास बँकेस टाळे ठोकण्याचा इशारा ही देण्यात आला आहे,
निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत.