नळदुर्ग विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी निखिल येडगे

नळदुर्ग, दि. ३:

 मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांच्या आदेशाने, मनसे नेते,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष  अमित ठाकरे यांनी छ्त्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे विद्यार्थी सेनेची कार्यकारणी जाहीर केली,यामध्ये जवळपास सहाशे नवीन पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे,


धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुकाध्यक्ष म्हणून सूरज चव्हाण यांची तर तालुका उपाध्यक्ष म्हणून गणेश बिराजदार,तर नळदुर्ग विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी निखिल येडगे यांची निवड अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली,



या निवडीचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,नळदुर्ग मनसे शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,जनहित कक्ष, व विधीज्ञ  डाँ.मतीन बाडेवाले,शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,रोहित नागरसे,दिलीप राठोड यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Top