नळदुर्ग,दि.१७:
शहराच्या सौंदर्यात भर पडणारी म्हणजेच गोलाई ते बसस्थानक पर्यंत महामार्गावरील दुभाजकात स्ट्रीट लाईट करण्याच्या मागणीस यश आले असुन आज स्ट्रीट लाइटचे खांब रोवण्यास सुरवात करण्याता आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार निवेदने,आंदोलन करत संबधीत अधिकारी यांच्याशी भेट घेवुन वेळोवेळी या विषयी पाठपुरावा केला. मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले,संबधीत विभागाने दुर्लक्ष केल्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष अलीम शेख व शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी अक्रम भुमिका घेतल्याने अखेर महामार्ग प्रशासन जागे होऊन ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला. अखेर प्रतीक्षा संपली असून गोलाई ते बसस्थानक पर्यंतच्या दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईटचे पोल उभे केले जात आहे. मनसेच्या माध्यमातून गेली दोन - अडीच वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ५८ पोल मंजूर झाले, व आज स्ट्रीट लाईटच्या कामाची अखेर प्रतीक्षा संपली,येत्या आठवड्याभरात महामार्ग प्रकाशमय होणार असल्याचे मनसे पदाधिका- यांनी सांगितले. शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने मनसेने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. याप्रकरणी नागरिकांच्यावतीने पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालयात एक्स रे सुविधा
नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात एक्स - रे,सोनोग्राफी आदीची सुविधा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आरोग्य विभागास केली होती. यामध्ये एक्स रे ही सुविधा सुरू करण्यात आली असून,सोनोग्राफीची सुविधा या आठवड्यात सुरू होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मुल्ला यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.