सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्णय 15 ऑगस्ट पासून मोफत उपचार
आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांची नागरिकांना स्वातंत्र्य दिनाची भेट

उस्मानाबाद,दि.13

 सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयात दाखल झाल्यास अनेकदा रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी दिली जाते. त्यामुळे पैसे आणि वेळ या दोन्हींचा अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून मोफत उपचार करण्यात येणार असून त्याबरोबरच रुग्णांना वा त्यांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांना काही तक्रारी असल्यास 104 या टोल फ्री क्रमांकावर त्याची नोंद करता येणार आहे.



 15 ऑगस्टपासून मोफत उपचारांची अंमलबाजवणी करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. रुग्णांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल आणि संबंधित संस्था प्रमुखास सांगितले जाईल, प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी संस्था प्रमुखाची असेल सार्वजनिक रुग्णालयात क्वचितप्रसंगी बाहेरील औषधे रुग्णास द्यावयाची गरज लागल्यास रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून स्थानिकरीत्या औषध खरेदी करून रुग्णास मोफत औषध उपलब्ध करून द्यावे. तसेच आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची असेल, रुग्णांना शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे निःशुल्क नोंदणी करण्यात यावी, आरोग्य संस्थांमध्ये होत असलेल्या सर्व तपासण्या मोफत कराव्यात. कोणतेही शुल्क आकारू नये,आरोग्य संस्थांमध्ये होत असलेल्या सर्व चाचण्या मोफत कराव्यात. कोणतेही शुल्क आकारू नये, यामध्ये सीटी स्कॅन, एक्स रे, प्रयोग शाळा चाचण्या यांचा समावेश आहे,



आंतररुग्ण विभागामध्ये दाखल झालेल्या रुग्णास डिस्चार्ज देताना कोणतेही शुल्क आकारू नये, यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करावे,रक्ताचे शुल्क भरावे लागणार,राष्ट्रीय रक्त धोरणानुसार व रक्त घटक पुरवठा यासाठी मात्र नियमानुसार असणारे शुल्क भरावेच लागणार आहे.

 
Top