विरमाता श्रीमती शांताबाई
बनसोडे यांच्या हस्ते शहीद किर्ती चक्र नायक यशवंत बनसोडे यांच्या शिला फलकाचे अनावरण
नळदुर्ग , दि.१४: एस.के.गायकवाड
माझा देश माझी माती या अभियानांतर्गत नगरपरिषद यांच्या वतीने आज केंद्रीय प्राथमिक शाळा नळदुर्ग येथील प्रांगणात किर्ती चक्र शहीद नायक यशवंत मारुती बनसोडे यांच्या शीला फलकाचे अनावरण विरमाता श्रीमती शांताबाई मारुती बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विनायक अहंकारी, केंद्रिय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर मस्के हे होते.
प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते किर्तीचक्र शहीद यशवंत बनसोडे यांच्या मातोश्री वीरमाता शांताबाई मारुती बनसोडे,शहीद राम सादु गायकवाड यांची वीरपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड सह सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विनयकुमार पंडीत, बाळासाहेब जाधव, बळी दस, शिवानंद खद्दे, दशरथ जाधव, प्रकाश मोर्डे, शिवशंकर हत्ते, विश्वनाथ हत्ते, कृष्णा माने, सुरेश सुरवसे, विठल जाधव,सिद्धराम मुळे इत्यादींचा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते शाल, पुष्गुच्छ व प्रमाण पत्र देवून सत्कार करून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी तर आभार सुरज गायकवाड यांनी केले.
यावेळी न.प.चे सर्व कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.