काटी येथे सन ग्रुप उद्योग  समुह व आर्ट  ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण 


काटी, दि.१४ 

 
तुळजापूर तालुक्यातील  काटी येथे धाराशिव जिल्ह्यातील नामांकित अशा सन ग्रुप उद्योग समुह  व आर्ट ऑफ  लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शुक्रवार  रोजी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही सध्या जागतिक चिंतेची बाब लक्षात घेत "झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे"  हा संदेश देत प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात  आला. 


पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून वृक्ष लागवड करणे काळाची गरज ओळखून पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या वृक्ष रोपवाटीकेचे धाराशिव येथील प्रसिद्ध सन ग्रुप उद्योग समूह आणि  आर्ट  ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सन ग्रुपचे सर्वेसर्वा तथा रोटरी क्लब  धाराशिवचे माजी जिल्हाध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख यांच्या पुढाकाराने प्रमुख पाहुणे शरद जगताप व  धिरज लोमटे नबाब (अंबाजोगाई) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी अजयसिंह देशमुख,विजय देशमुख, उद्योजक अमरसिंह देशमुख,संजय देशमुख, प्रदीप साळुंके, शरद जगताप,धिरज लोमटे नबाब, सयाजीराव देशमुख, प्रकाश गाटे, अशोक  जाधव,भिमसेन लोमटे, कृष्णा लोमटे, ओम लोमटे, अभिजित देशमुख, सत्यजित देशमुख, सिद्दु  बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top