स्ट्रीट लाईटच्या कामाचे
मनसे पदाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ
नळदुर्ग , दि. १५ :
नळदुर्ग शहरात गोलाई ते एस.टी. बसस्थानक पर्यंत महामार्गावर दुभाजकात करण्यात आलेल्या पथदिवेच्या कामाचे लोकार्पण आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा महामार्ग प्रकाशमय होणार आसल्याने मनसे कार्यकर्त्यांचे शहरवासियातुन आभिनंदन केले जात आहे.
नळदुर्ग शहराच्या सौंदर्यात भर पडणारी व महामार्ग प्रकाशमय करणाऱ्या स्ट्रीट लाईटचे उद्घाटन मनसे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन व पूजनाने करण्यात आले,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या दोन - अडीच वर्षापासून सतत निवेदन देत संबधीत अधिकाऱ्याशी भेट घेऊन संपर्क करत पाठपुरावा केल्याने स्ट्रीट लाईट मंजूर झाली,व अखेर स्ट्रीट लाईटचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मनसे पदाधिकाऱ्या हस्ते लोकार्पण करण्यात आले,
याप्रसंगी परिवर्तन सामाजिक संस्थेचे मारुती बनसोडे,जनहित कक्षाचे ॲड.मतीन बाडेवाले,मनसे शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,मनविसे,तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,मनविसे शहराध्यक्ष निखिल येडगे,शिरीष डुकरे,संदीप वैद्य,राम सातपुते,अमीर फुलारी,सरदार सय्यद,यादवराव कुलकर्णी, यांच्यासह रचना कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर सलामत टिनवाले,टोल वे कंपनीचे सुपरवायझर भूपेंद्र सिंह व वाहनधारक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.