उस्मानाबाद , दि. १६ :
 
  राञीच्यावेळी बंजारा समाजाच्या  एका कुटूंबातील दोन  महिलाना  घरात घुसून खासगी सावकाराने मारहाण केल्याने याप्रकरणी  अरोपीविरुध्द विनयभंगचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी  कुटूंबासह मुरुम पोलिस ठाणे येथे दि. २३  आॕगस्ट रोजी  उपोषण करण्याचे निवेदन पिडीत महिलेने उस्मानाबाद पोलिस आधिक्षक याच्यासह संबंधिताना दिले आहे.

  निवेदनात पुढे मुन्नाबाई राठोड यानी म्हटले आहे की,  मी आष्टा कासार ता. लोहारा येथील रहिवाशी आसून  शेतीवरच  कुटूंबीयांचा उदरनिर्वाह असुन माझ्या कुटुबात पती राजकुमार तुकाराम राठोड, सासरा तुकाराम राठोड, सासु कमलाबाई  व माझी तीन मुले असे आहेत. माझा मोठा दिर पांडुरंग हा विभक्त राहतो. माझे पती राजकुमार यांच्या नावाने आष्टा गावाच्या शिवारात साडे पाच एकर शेती आहे.

माझे पती बाहेर गावी गेल्याचे पाहून दि. 12 एप्रिल  रोजी रात्री 10:30 वाजता  आलूर ता. उमरगा येथिल दोघे खासगी सावकार घरात घुसून लज्जास्पद अशा अर्वाच्या भाषेत,  आम्हा महिलांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे नमुद करुन दिर पांडुरंग यास शेतजमीन वाटुन दया अन्यथा तुम्हाला खल्लास मारुन टाकीन असे तक्रारी आर्जात नमुद केले आहे. 


 याप्रकरणी मुरुम पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने  दोघा आरोपी विरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला. वासतविक पाहता गुंडगिरी करणाऱ्या व महिलांना मारहाण करणाऱ्या  आरोपीवर विनयभंगचा गुन्हा दाखल  करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी थातुरमातुर कार्यवाही केली.  पोलिसांचे आरोपीस अभय  असल्यामुळेच  आरोपी सतत दमदाटी करुन आम्हाला  आजही नाहकच ञास देत आसल्याचे बोलताना  सांगितले आहे.



गेल्या सात महिन्यापूर्वीपासून शेतजमिनी प्रकरणी वरील आरोपीसह माझ्या दिराकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे, रात्री बेरात्री येऊन नाहाक त्रास देण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहे. पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर उलट वरील आरोपी (खासगी सावकार) जास्तच त्रास देत आहेत. पोलिस आमचे काहीही वाकडे केले नाही, असे सांगून शेतजमीन हडप करण्यासाठी आम्हाला लज्जास्पद अर्वाच्या भाषेत शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत असल्याने याप्रकरणी दि. 17 जुलै रोजी पोलिस अधिक्षक यांना तक्रार अर्ज देऊन दुधणे (पिता पुञ) या आरोपीना आमच्या घराकडे येण्यास प्रतिबंध करावा व न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र याप्रकरणी पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आरोपीची मुजोरगीरी  वाढत आहे. म्हणुनच वारंवार आरोपी आमच्या घरी येऊन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आहेत.

 याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन दोषीवर दि. 22  आॕगस्ट रोजी पर्यतकठोर कारवाई करावी , आरोपी विरुध्द विनयभंगचा गुन्हा दाखल करुन अटक करावी, अन्यथा दि. 23 आॕगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मी माझ्या कुटुंबीयासह मुरुम ता. लोहारा येथील पोलिस ठाण्यासमोर न्याय मागण्यासाठी लाक्षणीक उपोषणास बसत आसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राजकुमार तुकाराम राठोड
खासगी सावकारांच्या  भाईगिरीमुळे माझे कुटूंब दहशतीखाली आहे. याप्रकरणी पोलिसाना वारंवार तोंडी व लेखी सांगुन दखल घेतली नाही.आम्हाला न्याय मिळावे म्हणुन गेल्या आठवड्यात पोलिस ठाणे येथे गेलो असता "पुन्हा पोलिस ठाण्यात येवु नको अशी पोलिसानि तंबी देवुन माझे अर्ज घेण्यास नकार दिला. म्हणुन  पोलिस अधिक्षक कार्यालय गाठले असे राजकुमार राठोड यानी तुळजापूर लाईव्हशी बोलताना  सांगितले.


 
Top