अणदुर दि.१७ :


भगतसिंग ज्या वयात देशासाठी फासावर गेले त्या वयातील आजचे युवक मिरवणुका व इतर कार्यक्रमांनी डीजेवर ताल धरत असल्याची खंत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक   पोलिस  निरीक्षक  स्वप्नील लोखंडे यांनी व्यक्त केली.

 ते अणदुर ता तुळजापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिकाचे प्रतिमापूजन, हुतात्मा स्तंभाला अभिवादन, स्वातंत्र्य सैनिक वारसांचा सन्मान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पदावरून बोलत होते. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेली वर्षभर अंणदुर येथील हुतात्मा स्मारकात वारसांचा सन्मान हुतात्मा स्तंभाला अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक पुत्र सुभाष स्वामी  तर प्रमुख पाहुणे म्हणून वारस श्रीमंतराव मुळे गुरुजी, माणिकराव कार्ले गुरुजी, रजाक शेख,  सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी, अणदुर ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण हे उपस्थित होते.
 

प्रारंभी गावातील २० स्वातंत्र्यसैनिकाच्या प्रतिमांचे व स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र लढा देताना वीरभद्र स्वामी यांनी वापरलेले चिलखत व हुतात्मा स्तंभाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  पूजन करण्यात आले .तदनंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
   

 यावेळी बोलताना सहाय्यक   पोलिस  निरीक्षक  स्वप्नील लोखंडे पुढे  म्हणाले की, आजच्या पिढीमध्ये देशप्रेम नसल्याने पुढच्या पिढीमध्ये ते कसे येणार असा प्रश्न उपस्थित करून या अगोदरची पिढी व आताची पिढी यातील अनेक उदाहरणे देत तुलना केली. भगतसिंगाच्या आईने 65 हजार युवकांपुढे व्यक्त केलेले मनोगत ही यावेळी त्यांनी विशद केले. पुढील पिढी समोर आता कर्तबगारीचा इतिहासच ठेवला पाहिजे येणाऱ्या पुढील काळात आई-वडिलांनी आता सजग राहण्याची आवाहन  त्यांनी शेवटी केले.
 

यावेळी स्वातंत्र सैनिक वारस श्रीमंत मुळे गुरुजी, प्राध्यापक सुभाष स्वामी , विनायक अहंकारी, पत्रकार राजकुमार स्वामी, यांचेही भाषण झाले.
  या कार्यक्रमास उमाकांत करपे, तात्या काळे, महावीर कंदले, रामचंद्र शेटे, अरविंद घोडके, मल्लिनाथ लंगडे  ,चंद्रशेखर आलुरे , सिद्राम सोमवंशी, सुरेश चव्हाण, बसवराज घुगरे, उमाकांत करपे ,बालाजी कुलकर्णी ,माणिक निर्मळे ,भारत गायकवाड ,बालाजी राजपुत,कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता देशमुख, शिक्षिका सुरेखा क्षीरसागर, विमल जाधव, आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हाळाप्पा घोडके, प्रजोत करपे ,संतोष तिरगुळे, शिवानंद खूने, काशिनाथ घुगे, आनिल अणदुरकर, नयन तोग्गी यांनी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत महोत्सव समितीचे सदस्य साहेबराव घुगे, तर सूत्रसंचालन व आभार राहुल राठोड यांनी केले.

 यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामात सशस्त्र लढा देणारे वीरभद्र स्वामी यांनी वापरलेले चिलखत  दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

 
Top