आष्टा (कासार) येथे रविवार दि.२० आँगस्ट रोजी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन

नळदुर्ग, दि. १३ : एस.के.गायकवाड


लोहारा तालुक्यातील आष्टा (कासार) जिल्हा उस्मानाबाद येथे रविवार दि.२०आँगस्ट २०२३ रोजी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराना  जिवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   

समिक्षा फाउंडेशन, लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्ट,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, बुद्धत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था व संबोधी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यामाने ग्रामीण भागातील आष्टा (कासार) येथे पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लातूर येथील  जेष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ.सुरेश वाघमारे हे आहेत. तर या सम्मेलनाचे उदघाटन माजी  मंत्री  बसवराज पाटील  यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत कथाकार जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे (सोलापूर),जेष्ठ लेखीका सुरेखा शहा,व लोहरा येथील शीघ्र पत्रकार निलकंट कांबळे आदी मान्यवराना समिक्षा फाऊंडेशन पुणे(आष्टा कासार) यांच्या वतीने दिवंगत पिताश्री तुकाराम गायकवाड यांच्या २४ व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,सहशिक्षक आर.जी.गायकवाड यांचा सेवानिवृत्तीबदल सत्कार अशा प्रेरणादायी कार्यक्रमाची जोड या सहित्यसंमेलनास देण्यात आली असून उदघाटन, परिसंवाद,विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचे कविसंमेलन व समारोप अशा चार सत्रात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक विचारवंत डॉ. डी.टी.गायकवाड यांनी दिली आहे.



पुढे बोलताना ते म्हणाले की,साहित्य हे समाजाचा आरसा असुन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी विचार, समता,स्वतंत्र, बंधुता व न्याय या च:तूसुत्रावर आधारित भारतीय संविधानाचे महत्त्व,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी अचार,विचार,आणि नेतृत्व समाजाच्या तळागाळातील लोकांच्यामध्ये रुजवावे समाजात नवीन नेतृत्व निर्माण व्हावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून कसलाही राजकीय हस्तक्षेप न ठेवता व कोणाकडूनही कसलेही आर्थिक मदत किंवा वर्गणी न घेता लुंबिनी बुद्ध विहार आष्टा (कासार) च्या प्रांगणात या पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील साहित्यिक,कवी, चळवळीतल कार्यकर्ते, साहित्य प्रेमी नागरिक,महिला व युवक युवतीने  या साहित्य संमेलनास उपस्थित राहवे असे आवाहन  डॉ.डी.टी..गायकवाड यासह समस्थ विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top