तुळजापूर तालुका फोटोग्राफर अध्यक्षपदी निजाम शेख; उपाध्यक्षपदी शिवानंद खुने यांची निवड
नळदुर्ग, दि. १३
तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशच्या अध्यक्षपदी निजाम शेख तर उपाध्यक्षपदी शिवानंद खुने यांची बिनविरोध निवड करण्यात आलीआहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे रविवार दि.१३ आॕगस्ट रोजी फोटोग्राफर सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नुतन कार्यकरणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली.
अध्यक्षपदी निजाम शेख, उपाध्यक्षपदी शिवानंद खुने,सचिव गणेश जवळगे,सहसचिव किरण कांबळे, कार्याध्यक्ष अलीम शेख,संघटक शुभंक मायाचारी, कोषाध्यक्ष किशोर वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे कोर कमेटी सदस्य प्रसाद देशमुख,संजय कुंभार,लक्ष्मण दुपारगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी प्रशांत साळुंके,सुधाकर राठोड, रोहित राठोड,बाळू डॅंग अदि फोटोग्राफर संघटनेचे सदस्य उपस्थित होते.