नळदुर्ग येथे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकारांचा गौरव
तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचा  उपक्रम 


नळदुर्ग ,दि. २० 

शनिवार दि. १९ ऑगस्ट रोजी   जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने विविध उपक्रमाने  जागतिक छायाचिञ दिन  उत्साहात  साजरा करण्यात आला.



यामध्ये  उस्मानाबाद  जिल्ह्यातील उत्कृष्ट छायाचित्रकारांचा सत्कार सोहळा,स्नेह भोजन, सप्तसुरांची संगीत मैफिल रंगली होती. 


शनिवार रोजी तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून  तुळजापूर  तालुक्यातील नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालय येथे जिल्ह्यातील  उत्कृष्ट व जेष्ठ छायाचित्रकारांचे  नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच छायाचित्रकारांसाठी स्नेह भोजन तसेच दशरथ शिंदे यांच्या सप्तसूर एक संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद देशमुख  तर प्रमुख उपस्थितीत बैंगलोर येथील प्रकाश चलवादी, सोलापूर येथील जेष्ठ फोटोग्राफर सुरेश लकडे, संघटनेचे अध्यक्ष निजाम शेख, उपाध्यक्ष शिवानंद खुने हे उपस्थित  होते.


यावेळी संघटनचे कोर कमेटी सदस्य संजय कुंभार,धनराज साखरे,लक्ष्मण दुपारगुडे,सचिव गणेश जवळगे, कार्याध्यक्ष अलीम शेख, संघटक शुभंक मायाचारी, कोषाध्यक्ष किशोर वाघमारे, सहसचिव किरण कांबळे,संघटक नितीन गायकवाड, रियासत शेख,अनिल जाधव, शिवानंद नाटेकरी,ज्ञानेश्वर केसकर,विशू बोंगरगे,सुनिल दिक्षित,सुहास राठोड,श्रीमंत डेंग,अक्षय पाटील,सुरज टेंगळे,अंकित शिंदे,शुभम राठोड, मारूती कोळी,आप्पा कांबळे, रमेश दबडे,मन्सूर शेख,रोहित राठोड,महमंद इनामदार लखन वाघमारे,विकी धुते,उमर सय्यद, खलील इनामदार,सह अदि फोटोग्राफर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रद्धा दुपारगुडे प्रास्ताविक निजाम शेख तर आभार लक्ष्मण दुपारगुडे यांनी मानले.
 
Top