तेरणा ट्रस्टच्या शिबिरात 700 रुग्णांची तपासणी,
मुंबईच्या डॉक्टरांनी केले रुग्णांवार उपचार, 60 ते 70 रुग्णांची होणार मोफत शस्त्रक्रिया


तामलवाडी ,दि.२४ :

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे रविवार दि.24 सप्टेंबर रोजी माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील व आमदार‎ राणाजगजितसिंह पाटील यांच्या‎ मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल‎ ट्रस्ट संचालित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा‎ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबई‎ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य‎ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


या आरोग्य शिबिरात‎ गावातील 700 महिला, पुरुष तसेच‎ बालकांनी लाभ घेतला. ह्रदयरोग, स्त्रीरोग,‎ कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग,‎ अस्थिरोग यासह विविध आजारांवर मुंबई‎ येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करुन मोफत औषधांचा पुरवठा केला. गावातील 60 ते 70 रुग्णांवर नेरुळ मुंबई येथील तेरणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरात डॉ.अजित निळे, डॉ.नयन लोढा, डॉ.अभिषेक पगारे, डॉ.तेजस कदम, डॉ. नम्रता जयस्वाल, डॉ. जोत्स्ना दमाणे या डॉक्टरांनी रुग्णांवार उपचार केले. 

यावेळी तेरणा मल्टीस्पेशालिस्टचे जनसंपर्क अधिकारी, विनोद ओव्हळ, पांगरदारवाडीच्या सरपंच सिंधू पोफळे, उपसरपंच सोमनाथ शिंदे, पत्रकार गणेश गायकवाड, तंटामुक्त  समितीचे अध्यक्ष प्रताप निंबाळकर, बापू साळुंके, माजी सरपंच बालाजी शिंदे, बालाजी डोंगरे, शंकर कदम, महेश सावंत, अमोल मारडकर, योगेश निंबाळकर, लक्ष्मण क्षीरसागर, नागनाथ मारडकर, आशा कार्यकर्त्या विद्या निंबाळकर, अनुराधा कदम, शाबीर शेख, ओंकार साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी डोंगरे यांनी केले तर आभार गणेश गायकवाड यांनी मानले. या आरोग्य शिबिरास तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन गणेश गायकवाड व सोमनाथ शिंदे यांनी केले होते.
 
Top