भंडारी येथील नितीन शिंदे आर्मी कम्बाईन ट्रेनिंगसाठी अमेरिकेला रवाना.
धाराशिव दि.२५ :
भारतमातेची सेवा करण्याचे भाग्य लाभणे ही अतिशय अभिमानाची आणी गौरवशाली गोष्ट आहे. आपल्या धाराशिव तालुक्यातील भंडारी या गावचे सुपुत्र श्री.नितीन दिलीप शिंदे हे या भाग्यवान व्यक्तीपैकी एक आहेत.श्री.नितीन शिंदे यांनी देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर आपल्या गावासह तालुक्याचे नाव झळकावले आहे.
यु.एस.ए. अमेरिका या ठिकाणी आर्मी कम्बाईन ट्रेनिंगसाठी त्यांची निवड झाली असुन दि.२४.९.२०२३ रोजी ते ट्रेनिंगसाठी रवाना झाले आहेत.त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरामधुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नामवंतानी,मान्यवरानी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री.नितीन शिंदे यांचे पाटोदा येथील मामा श्री.तानाजी भीमराव गव्हाणे हे माजी सैनिक असुन त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊन शिंदे यांना लहानपणापासुनच आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती.त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.