व्यसनमुक्त भारत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - मारुती बनसोडे
उस्मानाबाद ,दि.१६
आपल्या देशात व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असून युवा पिढी व्यसनाधीन होताना दिसत आहे व या व्यसनाधीनता अनिष्ट परिणाम होत असून युवकांचे जीवन धोक्यात येत आहे त्यासाठी आता युकानी व्यसनमुक्त होऊन भारत व्यसन मुक्त करण्यासाठी आता पुढे आले पाहिजे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा नशा बंदी मंडळाचे जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी केले आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर, येडाई व्यसनमुक्ती उपचार व समुपदेशन केन्द्र येरमाळा आणि परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने धारुर ता. जि.उस्मानाबाद येथे व्यसनमुक्ती या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी नशा बंदी मंडळ जिल्हा संघटक मारुती बनसोडे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे लोकप्रीय सरपंच बालाजी पवार हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये उपसरपंच पांडुरंग लोहार, समाज सेवक खांडेकर , सुनील शिंदे पोलिस पाटील इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना मारुती बनसोडे म्हणाले की, दारुमुळे आपल्या देशात दरवर्षी १०ते १३ लाख मरतात. पुरुषांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे १५ टक्के मृत्यू होतात. तंबाखूमुळे तोंडाचे कॅन्सर होतो तर गुटखा खणाऱ्याला हार्ट अटॅक येतो. सिगारेट ओढणाऱ्याला फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. दारुच्या व्यसनामुळे भारतात १८ टक्के मर्डर होतात. १८ सुसाईड होतात. ३४ टक्के दारुमुळे मृत्यू होतात. १५ टक्के दारूला स्पर्श करणारे फसतात, १७ टक्के गांजाला स्पर्श करणारे फसतात. १५ टक्के तंबाखूला स्पर्श करणारे फसतात . जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामध्ये ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी आता युवकांनी व्यसनाचा धोका समजून घ्यावा व यापासून दूर राहावे असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाटा सामाजिक संस्था तुळजापूरचे BSW चे विद्यार्थी आयुष राऊत, शुभम , दीक्षा, निधी, रिशव, जिशान यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील बचत गटांच्या महिला, नागरीक, युवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.