उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी मनसेच्या सौजन्याने कचरा कुंडी
मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या स्वखर्चातून उपक्रम


नळदुर्ग,दि . १५

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी स्वखर्चातून  ४ कचरा कुंड्या रुग्णालयास भेट दिल्या आहेत. रुग्णालयात स्वच्छता राखणे आवश्यक आहे,त्यामुळेच प्रमोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रुग्णालयात कचरा कुंड्या बसविण्यात आल्या आहेत.



रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकानी कचरा हा इतरत्र कुठे ही न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने व मनसे कार्यकर्त्यांनी   नागरिकांना केले आहे,यावेळी अधीक्षक डॉ इस्माईल मुल्ला,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण, यांच्यासह रुग्णालयातील स्टाफ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयासोबत संपूर्ण जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी देऊन जिल्हाशल्यचिकित्सक म्हणून डॉ इस्माईल मुल्ला यांच्याकडे जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचा मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी सत्कार केला,यावेळी डॉ.मुल्ला यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे  आभार मानले.



 
Top