कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची बीआरएसची मागणी
नळदुर्ग , दि. १९
कार्यारंभ आदेश देऊन तीन महिन्याचा कालवधी उलटून गेल्यानंतरही २० पेक्षा जास्त कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शहर बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे नगरपरिषद मुख्याधिकारी नळदुर्ग यांच्याकडे सोमवार (दि..१८) रोजी केली आहे.
ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध फंडातून ७ कोटी ३० लाख रुपये खर्च करून शहरातील विविध भागांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, गटारी, सभागृह व व्यायाम शाळा बांधणे, संरक्षक भिंतीचे काम, गार्डन विकसित करणे याच्यासह विविध कामे करण्यात येणार होते. या कामांसाठी पारस कन्स्ट्रक्शन कंपनी उमरगा यांना कार्यारंभ आदेश देऊन तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा केवळ दोन कामे पूर्ण झाले आहेत. तर सात ते आठ कमे हे सुरू आहेत. उरलेल्या २० पेक्षा जास्त कामे अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ही विकास कामे होतील किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या विरोधात कठोर पावले उचलून त्यास तात्काळ कामे सुरू करण्यासंदर्भात सूचना कराव्यात .जर काम सुरू करत नसेल तर त्याना दिलेली कामे रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवावी. तसेच कामे न करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन तात्काळ कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. जर सात दिवसाच्या आत उर्वरित विकास कामे सुरू न झाल्यास बीआरएस पक्षाच्यावतीने नगरपरिषद समोर दि. २७ सप्टेंबर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष अझहर शेख, जिल्हा मिडिया समन्वयक सुनील गव्हाणे, महिला शहराध्यक्ष रंजना ठोंबे, उपाध्यक्ष शांताबाई सोमवसे, शहर सचिव अहमदअली मनियार, कस्तुरा चौगुले, अन्वरा शेख, शेखआली शेख, खालेद मौजन, मेहबुब मौजन, कांताबाई मोरे, रेश्मा पवार, कस्तुरा कोळी, कविता निंबाळकर. जैनबी नदाफ, महानंदा धोत्रे, जुलैखाॕ शेख, आयेशा फकीर, रशीद जहागीरदार, रफीक मौजन, हिमायत मौजन, विरेंद्र पाटील, लक्ष्मी धोत्रे, कमलबाई चौगुले आदींची स्वाक्षरी आहे.