नळदुर्ग,दि.२२
येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी जखंणी तांडा येथील डॉ.सुभाष राठोड यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक बंजारा समाजाच्यवतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हरिष जाधव, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य अमृता चव्हाण, माजी अधिक्षक एम.पी. राठोड, के.यु. जाधव , लक्ष्मण चव्हाण उपस्थित होते.
डॉ.राठोड यांनी प्रतिकुल परिस्थिती असताना सुद्धा जिद्दीने शिक्षण घेऊन हिंन्दी विषयांचे प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले.नोकरी करत करत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजी नगर येथून बंजारा समाजाचा इतिहास या विषयावर पीएचडी संपादन केली.सध्या ते या महाविद्यालयात हिंदी विषय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. एकूण त्यांची सेवा बघुन प्रभारी प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मित्र परिवार बंजारा समाजामध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे.