गणरायाची माजी सैनिक संताजी थिटे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती; तर दि पिपल मल्टीस्टेटच्या वतीने कृष्णा थिटे याचा गौरव
  
काटी,दि.२६


 दि.पिपल मल्टीस्टेट  बॅंकेच्या तुळजापूर तालुक्यातील काटी शाखेमध्ये प्रतिष्ठाना करण्यात आलेल्या गणरायाची रविवार  दि.24 रोजी सायंकाळी 7:30 वाजता माजी सैनिक  समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संताजी थिटे यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी "गणपती बाप्पा मोरया" च्या  घोषणा देण्यात आल्या.

यावेळी दि पिपल  मल्टीस्टेट बॅंकेचे चेअरमन सुरज सुरेश पाटील (दहिवडीकर), माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, माजी सैनिक समाज पार्टीचे  तालुकाध्यक्ष संताजी थिटे, प्रकाश गाटे,शिवकुमार पाटील, पत्रकार  उमाजी गायकवाड, सचिन  साळुंके, विक्रम खपाले, अविनाश कोल्हे, बॅंक कर्मचारी गणेश गाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top