काटीतील मावळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आरती दि पिपल मल्टीस्टेट बॅंकेचे चेअरमन सुरज पाटील यांच्या हस्ते संपन्न
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील 35 वर्षांची परंपरा असलेल्या मावळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आरती दि पिपल मल्टीस्टेट बॅंकेचे चेअरमन सुरज सुरेश पाटील दहिवडीकर यांच्या हस्ते रविवार दि.24 रोजी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाली.
येथील बसस्थानक जवळील गावच्या प्रवेशद्वार असलेल्या मावळे गल्लीत मेन रोडवर गेल्या 35 वर्षापासून मावळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी देखील या मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम सुरु आहेत. रविवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दि पिपल मल्टीस्टेटचे चेअरमन सुरज सुरेश पाटील (दहिवडीकर) यांच्या शुभहस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. या पुजेचे विधीवत पौराहित्य पुजारी बाळासाहेब कुलकर्णी यांनी केले.
मावळे क्रिडा गणेश उत्सव समितीच्या वतीने कृष्णा थिटे यांचा सत्कार जिल्हास्तरीय शालेय लाॅन टेनिस क्रिडा स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कृष्णा संताजी थिटे याने जिल्हास्तरीय शालेय लाॅन टेनिस क्रिडा स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात अंतिम सामन्यात घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावत विभागीय फेरीत धडक मारली आहे. त्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते मावळे क्रिडा व व गणेश मंडळाच्या वतीने कृष्णा थिटे याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर माजी चेअरमन सयाजीराव देशमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके,प्रकाश गाटे, पत्रकार उमाजी गायकवाड, माजी सैनिक समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संताजी थिटे, शिवकुमार पाटील, अविनाश कोल्हे, जयाजी देशमुख,अमोल गावडे, सचिन साळुंके, सुहास साळुंके, राहुल गायकवाड, गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष अरबाज शेख, उपाध्यक्ष सुरज गायकवाड, कृष्णा थिटे, यशराज हुंडेकरी, दिपक हांडे, भैय्या गाजरे, रोहित गायकवाड, आदींसह मंडळाचे पदाधिकारी ,
सुनील परीट, पुजारी बाळासाहेब कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.