दोनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी केले रक्तदान , ए.सी.एम. ग्रुपचा पुढाकार

धाराशिव , दि .२९ : 

ईद-ए-मिलाद निमित्त हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी (रहे) दर्गाह समोरील ए.सी.एम. ग्रुपच्या वतीने आयोजित  रक्तदान शिबीरात  दि.२९ सप्टेंबर रोजी दोनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी  रक्तदान केले. सह्याद्री ब्लड बँकेने हे रक्त संकलित केले आहे.

इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने मुस्लिम बांधव हा पवित्र सण साजरा केला आहे.

ए.सी.एम. ग्रुपच्या रक्तदान शिबिराची ११ वर्षांपासूनची येथील परंपरा कौतुकास्पद आहे. आतापर्यंत सुमारे १,९०० पेक्षा जास्त लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान केले आहे. 

आज सर्व पक्षांच्या नेत्यांनी व सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच रक्तदान देखील केले आहे. विशेष म्हणजे आज तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, राजसिह राजेनिंबाळकर, काँग्रेसचे  अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, विश्वास शिंदे, शहर पोलिस निरीक्षक उस्मान शेख , जावेद शेख , यांनी भेट देऊन  शुभेच्छा दिल्या.

यावेळी एसीएम ग्रुपचे अध्यक्ष अजहर मुजावर, पोपटी करवीर, जमीर शेख, जफर शेख, शेख बाबा, चांद मुजावर, सादेख मुजावर, आरेफ मुजावर, रेहमान मुजावर, फवाद रजवी, इम्रान मुजावर, इल्यास मुजावर , सलीम पठाण , अमजद सय्यद, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top