औषध निर्माण अधिकारीपदी पदोन्नती  झालेबद्दल सचिन करंडे यांचा काटी ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार


काटी/उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवारी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंचपती सुजित हंगरगेकर यांच्या पुढाकाराने येथील  ग्रामपंचायतच्या वतीने   सचिन महादेव करंडे यांची  19 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत असताना सरकारी निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची मिरा भाईंदर  महानगरपालिकेत वरिष्ठ औषध निर्माण अधिकारीपदी  पदोन्नती झालेबद्दल त्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून  सत्कार करण्यात आला. 


या सत्कार सोहळ्यात सासुरे येथील माजी सरपंच तात्यासाहेब करंडे, उद्योजक प्रशांत भारती व सादिक शेख यांचाही सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकात   सुजित हंगरगेकर यांनी सत्कार  मुर्ती वैद्यकीय अधिकारी पदावरुन पदोन्नती  झालेले वरिष्ठ औषध  निर्माण अधिकारी सचिन महादेव करंडे यांचा परिचय करुन देताना ते काय करतात, त्यांची कार्य करण्याची पद्धत कशी आहे, आपली माणसं कोणत्या हुद्यावर आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी काय करता येईल, आपल्या गावकऱ्यासाठी  काय सुविधा उपलब्ध होतील याविषयीचा आराखडा मांडत ते म्हणाले की,काटी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन आमचा सत्कार स्वीकारल्याबद्दल कृतघ्नता व्यक्त करीत ते म्हणाले आपला सासुरे या मुळ गावी  सत्कार पाहून आम्ही खरोखरच भारावून गेलो असल्याचे सांगून बाहेरगावी खेड्यातील मुलाने उच्च पदावर गेल्याने ग्रामस्थांच्या मनात आपल्याविषयी असलेली भावना व आपली जन्मभूमी असलेल्या खेड्याविषयी असलेली आपली आत्मीयता व गावच्या विकासासाठी असलेली आपली तळमळ हे आम्ही बारकाईने टिपल्याचे सांगून भविष्यात आपल्या माध्यमातून निश्चितपणे  गावासाठी फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला.


सत्काराला उत्तर देताना औषध निर्माण अधिकारी सचिन करंडे म्हणाले की, डेंग्यूसदृश परिस्थितीवर नियंत्रण साधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासाठी लागणारी ब्लिचिंग पावडर, धुर फवारणी करण्यासाठी लागणारी फॉगिंग मशिन या सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी लागणारे साहित्य जे माझ्या गावात दिले जाईल ते सर्व साहित्य काटी ग्रामपंचायतला सुध्दा देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


या सत्कार सोहळ्यानंतर मावळे क्रिडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाची आरती  सचिन करंडे यांच्या हस्ते करण्यात आली.या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन जयाजी देशमुख यांनी केले तर आभार सुजित हंगरगेकर यांनी मानले.

यावेळी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रगतशील  शेतकरी प्रदीप साळुंके, सासुरे येथील माजी सरपंच तात्यासाहेब करंडे, उद्योजक प्रशांत भारती,सादिक शेख, प्रकाश गाटे,माजी सरपंच शामराव आगलावे,पत्रकार उमाजी गायकवाड, गजानन देशमुख, जयाजी देशमुख, चंद्रकांत काटे, बबन हेडे ,प्रकाश  सोनवणे,अमोल गावडे, शिवलिंग घाणे, दादा इंगळे, सहशिक्षक दयानंद गुरव, नाना जानकर, दत्ता  हंगरकर, कालू कुरेशी, बबन शिंदे, दत्ता राऊत,प्रशांत सुरवसे, सुधाकर जाधव, सिध्दु  बनसोडे आदी  उपस्थित होते.
 
Top