वागदरी, दि.०१ एस.के.गायकवाड
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशपातळीवर दि.१ आँक्टोबर २०२३ रोजी राबविण्यात येणाऱ्या एक तास स्वच्छतेसाठी या आभियाना अंतर्गत वागदरी ता.तुळजापूर येते एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
मौजे वागदरीच्या विद्यामान सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर यांच्या अध्यक्षतेखाली तर जेष्ट कार्यकर्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मीटकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.०० वा.येथील ग्रा. प.कार्यालयाच्या प्रांगणात एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी येथील हणूमान मंदिर परिसरात व जि.प.प्राथमिक शाळेच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.
या एक तास स्वच्छता आभियानात सरपंच तेजाबाई मिटकर, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील,अमोल पवार,अंकुल वाघमारे,सुरेखा यादव,सिआरपी विद्या बिराजदार,भाजपा मेडिया सेलचे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजकुमार पवार, उपाध्यक्ष मदन पाटील, उद्योगजक प्रकाश सुरवसे रिपाइं (आठवले )चे जिल्हा समन्वयक एस.के. गायकवाड,सामाजक कार्यकर्ते विलास बिराजदार, भालचंद्र यादव,दत्ता सुरवसे, ईस्माइल शेख,शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते,सहशिक्षिका आरती साखरे ,मनिषा चौधरी, सहशिक्षक तानाजी लोहार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार अंगणवाडीच्या पद्मीनीबाई पवार, रुपाली जाधव,आशा कार्यकर्ती पार्वतीबाई बिराजदार सह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.