नळदुर्ग ,दि.२० सप्टेंबर :
शहरातील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डाँ. सुभाष राठोड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल राठोड यांचे सर्वत्र आभिनंदन केले जात आहे.
नळदुर्ग येथिल बालाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. संजय कोरेकर हे नुकतेच निवृत्त झाल्याने प्रा.डाँ. सुभाष राठोड यांची त्यांच्या जागी निवड करण्यात आली आहे.
राठोड हे याच महाविद्यालयात शिक्षण घेतले. याच ठिकाणी प्राध्यापक म्हणुन १९९३ साली रुजु झाले.
तुळजापूर तालुक्यातील येडोळा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या जकनी तांडा येथिल राठोड हे रहिवाशी असुन त्यांचे प्राथमिक शिक्षण जकनी तांडा येथे तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नळदुर्ग, अकरावी कला ते बी.ए पदवी पर्यंत शिक्षण कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथे झाले. तर एम ए पदव्युत्तर शिक्षण दयानंद कला महाविद्यालय लातूर , पीएचडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद , त्याचबरोबर विद्यापीठांमध्ये बंजारा बोली भाषेचा अभ्यास व्याकरनिक भाषेत घेतला. १९९३ पासून नळदुर्ग याठिकाणी हिंदी विषायाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
स्वलिखित त्यांचे तीन पुस्तके प्रकाशित झाले आहे.
विद्यापीठांच्या विविध समितीवर काम, परीक्षा विभाग प्रमुख, एनएसएस विभाग प्रमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख, क्रीडा विभाग प्रमुख महाविद्यालयीन स्तरावरील कार्य संशोधन मार्गदर्शन म्हणून कार्यरत ,पाच विद्यार्थी संशोधन करत आहेत, दोन विद्यार्थी पीएचडी अवॉर्ड प्राप्त केले आहे.
महाविद्यालयातील विविध समितीवर यशस्वीपणे कार्य पार पाडले. बहुतांंश महाविद्यालयात हिंदी साहित्यावर व्याख्याने दिली. तर राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय एकूण 75 शोधनिबंध प्रकाशित झाल्याचे प्रभारी प्राचार्य डाँ सुभाष राठोड यांनी संवाद साधताना सांगितले .