धाराशिव, दि.२० सप्टेंबर 

लेडीज क्लब, धाराशिव च्यावतीने आयोजित  गौरी गणपती देखावा स्पर्धेत जिल्ह्यातील महिलानी सहभागी होण्याचे आवाहन लेडिज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई  राणाजगजितसिंह पाटील यानी केले आहे.


भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा व लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकाराने लेडीज क्लबच्यावतीने गौरी गणपती देखावा स्पर्धा  आयोजित  केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख रक्कमेचे  पारितोषिके देण्यात येणार आहे. 


 मंगळवारी गणरायाचे आगमन झाले आहे.  त्यानंतर गुरुवारी   दि.२१ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. जिल्हाभरात गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लेडीज क्लबचा नेहमीच पुढाकार आहे. याच अनुषंगाने लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे यदांही आयोजन करण्यात आले आहे. 


या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक  देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम पारितोषक रु.१०,००१ असून दुसरे पारितोषिक रु.७००१ तर तिसरे पारितोषिक रु.५००१ ठेवण्यात आले आहे. दि.२२ व २३ सप्टेंबर २०२३ रोजी परीक्षक हे स्वतः येऊन परीक्षण करतील. त्यानंतरच विजेत्यांची नावे जाहीर होतील.  जिल्ह्यातील महिला या स्पर्धेत सहभाग होऊ शकतील. तरी जास्तीत जास्त  या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.  


या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  ईच्छुकानी  पुढील मोबाईलवर संपर्क  साधावा. पुनगुडे  - ९४२०२००५४९, अस्मिता कांबळे - ९९७५२२७७७४, उषा येरकळ - ८९९९३८५४८४, संगीता भोरे- ९८५०२६२९१६, सुदेशना जाधवर - ९४०४६२३३५२   
 
Top