नळदुर्ग ,दि.२० सप्टेंबर , प्रा. दिपक जगदाळे 

येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक  धनंजय पाटील यांचीऑल इंडीया कॉलेज अँड युनिव्हर्सिटी एम्पलॉईज फेडरेशन च्या सदस्यपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

 धनंजय पाटील यांनी यापूर्वी देखील अनेक शिक्षेकेतर संघटनेवर पदाधिकारी म्हणून काम केले आहे .त्यांची काम करण्याची पध्दत पाहूनच त्यांची या जागेवर वर्णी लागली आहे . त्यांच्या या निवडीमुळे  धाराशिव जिल्ह्यातील  महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे  पधाधिकारी , महाविद्यालयातील  कर्मचारी वर्ग व  नागरिकांनी अभिनंदन केले.  
 
Top