कोतवाल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न
संपुर्ण महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव पतसंस्था
अक्कलकोट : दि.२७
सोलापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर ची पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर येथे जिल्हा अधिकारी बहुउद्देशीय सभागृह येथे वार्षिक सर्वसाधारण सभा विठ्ठल गुरव चेअरमन याचा अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुमार आशीर्वाद जिल्हा अधिकारी सोलापूर, राजशेखर लिबारे तहसिलदार मुंद्रुप हे उपस्थित होते.
कुमार आशीर्वाद जिल्हा अधिकारी राजशेखर लिबारे विठ्ठल गुरव चेअरमन चंद्रकांत हेडगिरे शतुन गायकवाड समाधान सुर्यगंध इरणा काबळे मलिनाथ बाळगी सर्व संचालक व संचालिका इतर मान्य वर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून, सोलापूर ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजाच्या फोटोला पुष्पहार घालून पुजा करण्यात आले.
यानंतर विठ्ठल गुरव चेअरमन यांनी संस्था चे प्रस्तावना सादर केले, तसेच संस्था काढायचे हेतु कोतवाल कर्मचारी समस्या जाणून कौटुंबिक, शैक्षणिक, सामजिक, आर्थिक पाल्याचे शैक्षणिक व वैद्यकीय खर्च, लग्न कार्य इतर गोष्टी चा विचार करून संस्था स्थापन करण्यात आले चे महिती विठ्ठल गुरव चेअरमन यांनी दिली.सन 28/12/2018 रोजी संस्था रजिस्ट्रेशन करणात आले असून, संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव संस्था सोलापूर जिल्ह्यात अस्तित्वात असून, संस्था रजिस्ट्रेशन कारणासाठी तात्कालीन जिल्हा अधिकारी डॉ राजेंद्र भोसले, तात्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख व शतुन गायकवाड यांच्या सहकार्याने ही संस्था रजिस्ट्रेशन करणात आली असून,सोलापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासद 348 सभासद असून संस्थेचे उलाढाल एक कोटी रुपये असलेल्या ची माहिती संस्थेने दिली , सभासद तसेच संस्थाने विविध उपक्रम राबवले असल्याचे सांगितले. कोविड काळात
दिवंगत कोतवाल यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये खालील विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहे.
दीर्घ ऐंशी हजार रुपये, तातडीचे कर्ज वीस हजार रुपये
मासिक वर्गणी एक हजार रुपये असे निर्णय एक मताने मंजूर केला आहे असे महिती चेअरमन विठ्ठल गुरव यांनी दिले आहे.
पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा कुमार आशीर्वाद जिल्हा अधिकारी सोलापूर, राजशेखर लिबारे तहसिलदार, चंद्रकांत हेडगिरे निवासी नायब तहसिलदार, शतुन गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष महसूल कर्मचारी कषणा शिंदे सरचिटणीस कोतवाल संघटना, जंयत जुगदार जिल्हाध्यक्ष, लक्ष्मीकांत ऐगोळे जिल्हा प्रवक्ता, विठ्ठल गुरव जिल्हा उपाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना बंदीश वाघमारे, जिल्हा अध्यक्ष वाहान चालक संघटना, मनोज भाडेकर, जिल्हा अध्यक्ष बाबा कांबळे, अनिल जाधव, प्रसिद्धीप्रमुख प्रविणकुमार बाबर, सचिव भगवान पारशी विठ्ठल गुरव चेअरमन, व्हाईस-चेअरमन समाधान सुर्यगंध, मुख्य प्रवर्तक मा.दिलावर वाघमारे, कृष्णा शिंदे, राहुल तोडकरी,मल्लिनाथ बाळगी,औदुसिध्द पुजारी,प्रल्हाद खरे,संजय वाघमारे, राजेंद्र कुंभार, सुलोचना देशमुख, गुरुदेवी पुजारी, -ईराण्णा कांबळे.संचाक मंडळासह सभासद उपस्थित होते.