नळदुर्ग ,दि.२७ :


युनिटी मल्टिकाॕन्स कंपनीने शासनाकडून संगोपनार्थ घेतलेल्या नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याची  सोमवार दि. २ आॕक्टोबर रोजी तुळजापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने स्वच्छता आभियान राबवुन
साफसफाई करुन छञपती शिवाजी महाराजाना आनोखी मानवंदना देणार आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज यांंच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर , बालाघाट महाविद्यालय नळदुर्गचे प्रशिक्षणार्थी , संस्थेचे कर्मचारी आदीच्यावतीने येत्या दि. 2 ऑक्टोबर  रोजी नळदुर्ग येथिल ऐतिहासिक  किल्ल्यात   स्वच्छता अभियान  राबविण्यात येणार असल्याची  माहिती पञकाद्व्रारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यानी दिली आहे.


महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील सर्व कार्यालय, संस्था मधून स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत असून स्वच्छता अभियानाची सांगता ही महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील गड किल्ले साफसफाई करून होणार आहे.  त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग किल्ला येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूरच्या वतीने साफसफाई करण्यात येणार आहे. 

यामध्ये संस्थेतील 50 प्रशिक्षणार्थी व संस्थेचे कर्मचारी सहभाग नोंदविणार आहेत. तसेच नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम) शाखेच्या वीस प्रशिक्षणार्थी सहभागी होतील. सर्व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शिवरायांना अनोखी मानवंदना देणार आहेत.
 
Top