नळदुर्ग :  गटारीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची दस यांची मागणी

नळदुर्ग ,दि.२६ - 

 नळदुर्ग येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत नरसु दस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नळदुर्ग येथील सार्वजनीक बांधकाम खात्या मार्फेत नळदुर्ग नगर परिषद हद्यीमध्ये (पारस कंट्रक्शन उमरगा) यांचे मार्फत प्रभाग क्र. ५ शमा टेलर घर ते झुबेर काझी घर येथील गटारीचे व प्रभाग क्र. ६ येथील खालेद काझी घर ते दाऊद शेख घरापर्यंत गटारीचे काम अंदाज प्रत्रकानुसार न करता अतिशय  निकृष्ट दर्जाचे केले आहे. या पुर्वीच्या जुन्या झालेल्या गटारीच्या कामावरच नवीन काम करण्यात आलेले आहे. 


हे काम जाईंट मेजर पध्दतीने चौकशी केल्यास वस्तुस्थिती लक्षात येईल. त्यामुळे या कामाची योग्य ती चौकशी केल्याशिवाय संबंधित पारस कंट्रक्शनचे बील अदा (पेड) करु नये. तसेच या कामाची योग्य ती चौकशी करुन ७ दिवसांमध्ये कार्यवाही करावी. अन्यथा ना इलाजास्तव तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दस यांनी दिला आहे.

 
Top