डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडणाऱ्यांचा रिपाइं (आठवले) व दलित पँथर सह विविध संस्था संघटनेच्या वतीने जाहीर निषेध : पुर्ववत स्वागत कमान बांधून देण्याची केली मागणी
नळदुर्ग,दि.२४ : एस.के.गायकवाड
सांगली जिल्ह्यातील मौजे बेडग ता.मिरज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान जाणीवपूर्वक बेकायदेशीर ठरवून तेथील ग्रामसेवक,सरपंच व उपसरपंच यांनी पाडली आहे.सदर घटनेचा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) व दलित पँथर सह विविध पक्ष,संस्था आणि संघटनेच्या वतीने नळदुर्ग येथे जाहीर निषेध करून पूर्ववत स्वागत कमान बांधून देण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे याना रिपाइं (आठवले),भिम-आण्णा सामाजिक संघटना, परिवर्तन सामाजिक संस्था, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे बेडग ता.मिरज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान बांधण्यात आली होती. परंतु येथील कांहीनी जाणीव पूर्वक जातिय द्वेशभावनेतून बेकायदेशीर ठरवून ती कमान पाडली आहे.सदर घटना ही निंदनीय असून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडणाऱ्यांवर अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करून सदर स्वागत कमान पूर्ववत बांधून देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात आंबेडकरी आनुयायानी काढलेल्या मानगाव ते मुंबई लाँग मार्च आंदोलनास आणि रिपाइंच्या वतीने हातकलंगणे तहसील समोर चालू असलेल्या उपोषण आंदोलनास जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नि.स्वप्नील लोखंडे याना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे आठवलेचे धाराशिव जिल्हा समन्वय एस.के.गायकवाड, अरुण लोखंडे, बाबासाहेब बनसोडे, बाशिद कुरेशी, बाबासाहेब मस्के, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागीले,परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे, भिम-आण्णा सामाजिक संघटनेचे जिल्हा संघटक धर्मराज देडे, जिल्हा समन्वय प्रशांत धरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष आनंद (पिंटू) पुदाले, युवा कार्यकर्ते सतिश सुरवसे, विशाल मुकदान, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अमित लोंढे आदीच्या सह्या आहेत.