अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 12 छापे.”
धाराशिव , दि.२४:
मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.23.09.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 12 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,870 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 210 लि. गावठी दारु, 30 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 3,26,180 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 ठिकाणी छापे टाकले. दत्तानगर पारधी पिढी ढोकी ता.जि.धाराशिव येथील-सुमाबाई मोहन पवार, वय 50 वर्षे, या 14.40 वा. सु. आपल्या राहात्या घराचे बाजूला अंदाजे 43,400 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे 570 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 35 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर जुनी दुध डेअरी पारधी पिडी डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव येथील- रुपाली विजय पवार, वय 24 वर्षे, या 16.40 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या बाजूस डिकसळ येथे अंदाजे 33,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव दारु जप्त करण्यात आली. तर गावसुद पारधी वस्ती, ता. जि धाराशिव येथील- नामदेव साहेबा काळे, वय 45 वर्षे, हे 15.50 वा. सु. गावसुद पारधी वस्ती ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 61,600 ₹ किंमतीचे 800 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 45 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर चिमनवस्ती तेरखेडा, ता. कळंब जि धाराशिव येथील- शारदाबाई शिवाजी काळे, वय 52 वर्षे, या 17.00 वा. सु. तेरखेडा शिवारातील सुर्या बार समोरील चिमनवस्ती ता. कळंब जि. धाराशिव येथे अंदाजे 46,600 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. तर रामनगर, सांजा ता. जि धाराशिव येथील- बब्रु गुलाब काळे, वय 65 वर्षे, हे 14.00 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर रामनगर सांजा ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 41,200 ₹ किंमतीचे 500 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 35 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
2) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. बक्षी हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर ह.मु. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-गुरुदेव नुरा राठोड, हे 14.00 वा. सु. राजु गुराप्पा राठोड यांचे शेतात खडकी शिवारात अंदाजे 48,600 किंमतीचे 1,600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3) लोहारा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यात भातांगळी, ता. लोहारा जि. धाराशिव येथील- सचिन विकास जगताप, वय 23 वर्षे हे 18.50 वा. सु. आपल्या चिकनचे दुकानासमोर भामांगळी येथे अंदाजे 2,400 ₹किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. यात तेरखेडा, ता. वाशी जि. धाराशिव येथील- प्रविध बाळासाहेब घोलप, वय 34 वर्षे हे 19.00 वा. सु. तेरखेडा येथे ब्रिजचे पाठीमागे जाणारे बोळीत अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी 15सिलबंद बाटल्या बाळगलेले त्या जप्त करण्यात आल्या.
5)उमरगा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात कैकाडी गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- प्रकाश धोंडीबा जाधव, वय 73 वर्षे, या श्री गुरु ॲक्वा च्या बाजूला पत्राचे शेड समोर उमरगा येथे अंदाजे 3,900 ₹ किंमतीची 45 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. यात बालाजी मंदीर मागे उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- प्रकाश सदानंदे, वय 32 वर्षे, हे बालाजी मंदीराचे पाठीमागे पत्राचे शेड समोर उमरगा येथे अंदाजे 2,800 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. यावेळी सलगरा मड्डी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-राजु किसन राठोड, वय 45 वर्षे, हे 18.50 वा. सु. निसर्ग धाब्याचे पाठीमागे मोकळ्या जागेत सलगरा मड्डी ता. तुळजापूर येथे अंदाजे 630₹ किंमतीच्या 9 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
7) आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. यावेळी पारधी पिढी, सांजा ता.जि. धाराशिव येथील-शिवाजी शंकर पवार, वय 45 वर्षे, हे 19.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर सांजा धाराशिव येथे अंदाजे 44,000₹ किंमतीचे 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 40 लि. गावठी दारु करण्यात आली.