पुजारी नगर तुळजापूर येथील बालगणेश मंडळाच्या गणरायाला जल्लोषी वातावरणात निरोप; हलगीच्या तालावर बालकांनी  धरला ठेका!

तुळजापूर/उमाजी  गायकवाड 

तुळजापूर  येथील नळदुर्ग रोडवरील पुजारी मंगल कार्यालयाच्या पाठीमागील पुजारी नगर कॉलनीतील सर्व बालकांनी एकत्रित येऊन येथील मुख्य प्रवेशद्वारात बसवलेल्या गणरायाला हलगीच्या निनादात, गुलालाची मुक्त उधळण करीत बैलगाडीतून कॉलनीत मिरवणूक  काढत कॉलनीतील गणेश मुर्ती बैलगाडीत ठेवून "गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…"  "गणपती गेले गावाला चैन पडेला आम्हाला…" अशा घोषणा देत बाल गणेश भक्तांसह कॉलनीतील सदस्यांनी पाचुंदा तलावात उत्साहात व जल्लोषी वातावरणात गणरायाचे विसर्जन केले.

मिरवणुकी दरम्यान  हलगीच्या तालावर बालकांसह कॉलनीतील सदस्यांनीही चांगलाच ठेका धरला होता!
गेल्या दहा दिवसाच्या पाहूनचारानंतर लाडक्या बाप्पांनी गुरुवारी निरोप घेतला. श्री गणेश चतुर्थीला मोठ्या आनंदात उत्साहात व जल्लोषात भाविकांनी गणरायाचे आगमन केले त्यावेळी असणारा तोच आनंद आणि उत्साह बाल गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर विसर्जनाच्या यावेळी दिसून येत होता.

या मिरवणुकीत गणेश भक्त तनिष्क जाधव,श्रेयश बामणकर, विराट गायकवाड,सुरज कुंभार, पृथ्वीराज कुंभार, चिकू पुजारी, साई जाधव,आदर्श,प्रतिक कांबळे या बालकांसह कॉलनीतील नामदेव कंदारे, धनंजय शिंदे,पत्रकार उमाजी गायकवाड, अप्पा आवताडे, रंगनाथ पुजारी, विश्वनाथ,प्रविण शिंदे, बापू  नाईकवाडी,शंतनु आवंडे, राहुल जाधव, लिंबाजी पुजारी,कुणाल गायकवाड, तानाजी भिसे, बबन पाटील आदी सदस्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
 
Top