महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दरलींग दिलीप माळी तर 
उपाध्यक्षपदी सागर संतोष काळे व अजित कैलास मदने यांची निवड

काटी/उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दरलिंग दिलीप माळी तर उपाध्यक्षपदी सागर संतोष काळे व अजित कैलास मदने यांची निवड यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत   ही निवड करण्यात आली. महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीचे यंदा हे 42 वे वर्ष आहे. 

या बैठकीत महात्मा फुले तरुण मंडळ व शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या  माध्यमातून करण्यात येणाऱ्या आराखड्याची माहिती व बैठकीतील विषयावर सविस्तर चर्चा करुन नवरात्र काळात स्त्री शक्तीचा जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमासह प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने यांनी सांगितले. 


या निवड समितीच्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून प्रत्येकाकडे शारदीय नवरात्र उत्सवाची जबाबदारी दिली आहे. तसेच नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने  संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने व उत्सव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भाले यांनी केले आहे.


उर्वरित कार्यकारिणीत  खजिनदारपदी सचिन निवृत्ती भोजने, तानाजी दतु हाजारे,  रमेश जामगावकर,शुभम काटकर,संयोजकपदी संजय सांळुके, बाळासाहेब भाले, हर्षवर्धन ढगे,विष्णु ढगे  ज्योत व्यवस्थापदी जयदीप भोजने, श्रीकांत भोजने, तात्यासाहेब चवळे,सोमनीथ शिंदे, गौरव राऊत,संदीप ढगे, पांडुरंग राउत,लेझीम प्रमुखपदी गोविंद म्हेत्रे अनिकेत ढगे, गोविंद सुरवसे, रोहीत बामणकर,श्रीकांत भोजने, बाळासाहेब वाघमोडे,   सांस्कृतिक विभाग प्रमुख अमोल वेदपाठक, विशाल ढगे मिरवणूक प्रमुखपदी सचिन  भोजने, तानाजी हाजारे, प्रभाकर   चवळे, सतीश भाले,संपत राऊत, बालाजी ढगे तसेच मंदिर व्यवस्थेसाठी गोविंद हाजारे, तात्यासाहेव चवळे,अक्षय माळी, विनायक बनसोडे, यशवंत काळे, शुभम हाजारे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.


यावेळी ,उत्सव समितीचे नुतन अध्यक्ष दरलिंग दिलीप माळी, उपाध्यक्षपदी सागर संतोष काळे व अजित कैलास मदने, बालाजी ढगे,काशिनाथ काळे, तात्यासाहेब चवळे,बाळासाहेब भाले,सचिन भोजने,संतोष काळे, तानाजी हजारे, ज्योतिराम चवळे, अनिल ढगे,हर्षवर्धन ढगे,प्रफुल्ल म्हैत्रे, संजय साळुंके,किसन ढगे, विष्णू ढगे,दादासाहेब काळे, प्रभाकर चवळे,गणेश काळे, सचिन घाणे,शाहू बनसोडे, गोकुळ शिंदे,पांडुरंग कवठे, अमोल वेडपाठक, यशवंत काळे, विशाल ढगे आदींसह मंडळातील सदस्य उपस्थित होते.
 
Top