अनंत चतुर्दशी व ईद -ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलिसांचे पथसंचलन
काटी /उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशन च्या वतीने गुरुवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी होणारे गणेश विसर्जन व मुस्लिम धर्मियांच्या ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने या दोन्ही सण उत्सवा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तामलवाडी पोलिसांनी कंबर कसली असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुबोध बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या पुर्वसंध्येला बुधवार दि. 27 रोजी सायंकाळी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव व काटी गावातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी पथसंचलन केले.
तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक सुबोध बनसोडे
यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन झाले.
तामलवाडी पोलिस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी, 12 पोलीस अंमलदार व 28 होमगार्ड यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला होता.
यावेळी तामलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण यांनी दिली आहे.