राज ठाकरे यांच्या आदेशानंतर, फुलवाडी टोलनाक्यावर मनसे आक्रमक ; टोल न घेता शेकडो वाहने सोडली, पोलिसांचा टोलवर तगडा बंदोबस्त
नळदुर्ग ,दि.१०
सद्या राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोलच्या मुद्यावरून आक्रमक झाली आहे,त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी वाहने ही राज्यात सर्व टोल नाक्यावर टोलमुक्त केली आहेत अशी घोषणा केली, त्यानंतर दि- 9 ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली,अन त्या पत्रकार परिषदे मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यानुसार सर्व राज्यातील टोलवर 2,3,4 चाकी वाहने ही टोल न घेता सोडावी व त्यासाठी सर्व मनसे सैनिक टोल प्लाजावर जातील आणि हे वाहने टोल मुक्त करून सोडत आहेत की नाही हे बघतील अन हे करताना जर त्यांची अडवणूक केली तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा गंभीर इशारा सरकारला दिला.
त्यानंतर राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले, तुळजापूर तालुक्यातील सोलापूर - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गवरील फुलवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते धडकले अन सर्व चारचाकी वाहने टोल न घेता सोडली, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांनी सरकार व टोल प्रशासनाला तीव्र शब्दात समज दिली. जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,नळदुर्ग शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी टोल प्लाजाला चारचाकी वाहने टोल मुक्त करून सोडावीत अन्यथा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही असा इशारा दिला,त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी शेकडो वाहने टोल न घेता सोडायला लावली,अनेक वाहनधारकांनी राजसाहेबाचा विजय असो अशा घोषणा देत,कार्यकर्त्यांना हस्तानदोलन केले व आनंद व्यक्त केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंखे,उमरगा तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड,नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे,नळदुर्ग शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, शहर संघटक रवि राठोड,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,गणेश बिराजदार,तुळजापूर शहर उपाध्यक्ष अविनाश पवार,झुंबर काळदाते, तुळजापूर मनविसे शहराध्यक्ष ऋषीं माने,शिरीष डुकरे, सुशील पुरंत, दिलीप राठोड,अजय डांबरे,धनंजय मुडुळे ,सोमेश्वर आलूरे,शुभम चव्हाण,स्वप्निल तिरगुळे,प्रदिप सांळुखे,रामानंद रिंगणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.