कृषी पुरक व्यवसायातून युकानी आत्मनिर्भर व्हावे - मारुती बनसोडे


नळदुर्ग ,दि.०३

महागाई वाढली आहे, नोकऱ्या मिळत नाहीत व वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी युवकांनी कृषी पुरक व्यवसायातून आत्मनिर्भर व्हावे व आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी केले आहे
जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांनी मांडावा ता. वाशी येथे. दि.३० सप्टे.२०२३ रोजी पशुपालन आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. गाय पालन, म्हैस पालन व शेळी पालन यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती करता येते व पशुधन हे मानवी जीवनात अत्यावश्यक आहे असे ही त्यांनी सांगितले. उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मांडावा गावातील चाळीस युवक युवतींसाठी हे  प्रशिक्षण आयोजित केले आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चे जिल्हा प्रमुख पांडुरंग मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व लतिफा जहागीरदार यांच्या संयोजनात ही कार्यशाळा यशस्वी पार पडत आहे.
 
Top