नळदुर्ग येथे पोषण आहार पंधरवडाचा समारोप

नळदुर्ग ,दि.०३ एस.के.गायकवाड


राष्ट्रीय पोषण आहार महीना आभियान अंतर्गत नळदुर्ग ता.तुळजापूर येथे शहरातील १ ते ९ अंगणवाडीत पोषण आहार पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात आला असून येथील भिमनगर बौद्ध विहारात १ ते ९ अंगणवाडी एकत्र येवून या पोषण पंधरवाडा  आभियानाचा समारोप केला.
  

सही पोषण देश रोषण,सुपोषित भारत साक्षर भारत,सशक्त भारत राष्ट्रीय पोषण महिना आभियान अंतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प (ICDS)   आधिकारी  कड  यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग शहरातील एकूण नऊ अंगणवाडी मध्ये पोषण आहार पंधरवडा साजरा करण्यात आला. या पोषण पंधरवड्याचा समारोप येथील भिमनगर बौद्ध विहारात अंगवाडी क्रमांक १ ते ९ अंगणवाड्यानी एकत्रितपणे केला.
   

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी  कड  होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, सुर्यकांत  सुरवसे आदी होते.याप्रसंगी  कड व अंगणवाडी मुख्य सेविका श्रीमती मगर  यांनी बेटी बचाव बेटी पढाव,एक मुल एक झाड, पर्यावरण, स्वच्छता आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.यानिमित्ताने फँन्शी ड्रेस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
  

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका ज्योती घोडके,सुनिता इंगोले,किरण शिंदे,संगीता राठोड,बाडेवाले आस्मा,जाधव सुनिता, गायकवाड रोहिणी,बनसोडे अशा, बावारते आस्मा आदीनी  परिश्रम घेतले. यावेळी गरोदर माता,किशोरवयीन मुली,महिला, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top