श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न


मुरूम, दि. २२, 

 येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२३-२४ साठीचा बॉयलर प्रदिपन सोहळा कारखाना कार्यस्थळावर शनिवारी  रोजी पार पडला. 

 यावेळी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरू असून हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून १२ हजार ५४५ हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. यापासून जवळपास १४ लाख मे. टन ऊसाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. यासाठी पुरेशी वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता विचारात घेवून कारखान्याच्या संचालक मंडळाने ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखान्याचा मोळी पुजनाचा कार्यक्रम दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे. 

या हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी दिली. व त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी   जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादीकमियाँ काझी, उमरगा जनता सहकारी बॅकेचे चेअरमन शरण पाटील तसेच कारखान्याचे संचालक  विठ्ठलराव पाटील, शरणाप्पा पत्रिके, केशवराव पवार, माणिक राठोड, विठ्ठलराव बदोले, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, राजीव हेबळे, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, अँड. विरसंगप्पा आळंगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, रशिद शेख, गोविंद पाटील, अँड. शरणाप्पा पत्रिके, प्रमोद कुलकर्णी, देवेंद्र कंटेकुरे, चंद्रशेखर पवार, महालिंग बाबशेट्टी, राजू तोडकरी, कार्यकारी संचालक एम. बी. अथणी सह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.
 
Top